January 19, 2026 6:27 PM

views 5

भारताचा यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील-IMF

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ७ दशांश टक्क्यांनी वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व क्षेत्रातली कामगिरी मजबूत होत असल्यानं यंदा आर्थिक वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे. पुढच्या आर्थिक वर्षात २०२६-२७ मधे भारताच्या आर्थिक वाढीचा दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील तसंच सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची असेल, असा अंदाज आज नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वा...