January 14, 2025 7:46 PM
10
हवामान विभागानं नागरिकांचं जीवनमान सुलभ केल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार
विज्ञानानं सर्वसामान्यांचं जीवनमान सोपं करावं आणि हवामान विभाग या कसोटीवर पात्र ठरत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारतीय हवामान विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. देशातल्या ९० टक्के जनतेला हवामान विभागाच्या सुविधांचा लाभ होतो. मागील १० दिवस आणि आगामी १० दिवसांच्या हवामानाची माहिती सामान्य नागरिकांना आता सहज मिळते, असं ते म्हणाले. हवामानशास्त्र विभागाच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त एका विशेष...