August 26, 2024 1:40 PM

views 20

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवसांत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्येही हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात, तसंच  झारखंडमध्येही पुढील...

August 19, 2024 7:48 PM

views 35

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता -हवामान विभाग

गेल्या चोवीस तासात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

August 16, 2024 7:38 PM

views 22

येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

येत्या दोन दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी, कोकणात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

August 6, 2024 3:06 PM

views 23

येत्या २ ते ३ दिवसांत देशात पावसाचा अंदाज

येत्या २ ते ३ दिवसांत देशाच्या पूर्व आणि वायव्य भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधेही आज तर पश्चिम आणि मध्य भारतात येत्या २ दिवसांत जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

July 30, 2024 7:53 PM

views 22

महाराष्ट्रात येत्या २ दिवसात पावसाची शक्यता

येत्या २ दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

July 30, 2024 10:19 AM

views 16

येत्या 3 – 4 दिवसात भारताच्या वायव्य भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

येत्या 3 - 4 दिवसात भारताच्या वायव्यदेखील विविध राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे . हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , जम्मू काश्मीर , लडाख , पंजाब, हरियाणा, छत्तीसगड , दिल्ली, उत्तरप्रदेशचे आणि पश्चिम राजस्थानात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असून , तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे .   तसच येत्या 2 ऑगस्टपर्यंत कोकण , गोवा , मध्यप्रदेश , दक्षिण कर्नाटकातील दुर्गम भाग आणि किनारी प्रदेश आदि राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हव...

July 22, 2024 7:37 PM

views 22

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिल...

July 21, 2024 12:59 PM

views 21

पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान संस्थेने व...

July 5, 2024 2:55 PM

views 15

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

उत्तराखंड आणि ईशान्य भारतात बहुतांश ठिकाणी येत्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, हिमाचल, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगढ मध्येही पुढील तीन चार दिवसात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज विभागानं दिला आहे.महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या तीन ते चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

June 28, 2024 11:54 AM

views 19

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल सुरू

नैऋत्य मोसमी पावसाने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण अरबी समुद्र, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचा बहुतांश भाग, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेशच्या काही भागात मान्सूनची आगेकूच झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल सकाळी पावसाच्या सरी बरसल्या.