November 30, 2025 7:14 PM November 30, 2025 7:14 PM

views 16

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली. येत्या २ दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता  

November 9, 2025 1:17 PM November 9, 2025 1:17 PM

views 11

भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात होणार २ ते ५ अंश सेल्सिअस घट

देशाचा वायव्य प्रांत आणि मध्य भारताच्या काही भागात पुढले ५ ते ६ दिवस रात्रीच्या तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअस घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत किमान तापमानात जवळजवळ २ अंश सेल्सिअस घट होईल, तर  राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील  असा अंदाज आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आणि करैकल मध्ये काही ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  दरम्यान, राजधानी दिल्ली आणि परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली ...

September 15, 2025 2:46 PM September 15, 2025 2:46 PM

views 32

महाराष्ट्रात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हिमाचल प्रदेशात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे. पावसामुळे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि ५९८ रस्ते बंद झाले आहेत तसच वीज, पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू तर ४६२ जण जखमी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.   महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. काल मध्य रात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हो...

September 15, 2025 10:23 AM September 15, 2025 10:23 AM

views 22

महाराष्ट्रासह देशाच्या इशान्ये कडील राज्यांना पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्ये कडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.   तर उद्या विदर्भ, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, नागालँड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार पावासाचा इशाला दिला आहे. राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस राज...

July 26, 2025 10:41 AM July 26, 2025 10:41 AM

views 20

महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले असून साधारण साडेपाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.   तसंच,  मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उद्यापर्यंत समुद्र खवळलेला असेल आणि उंच लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांनी समुद्रात जा...

July 19, 2025 8:43 PM July 19, 2025 8:43 PM

views 18

केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट

केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे.  वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

July 19, 2025 3:23 PM July 19, 2025 3:23 PM

views 14

केरळ आणि उत्तराखंडमधे उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी

केरळ आणि उत्तराखंडच्या काही भागासाठी हवामान विभागानं उद्यापर्यंत अती जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिळनाडू, कोकण, गोवा आणि कर्नाटकमध्ये देखील आज जोरदार ते अती जोरदार पावसाचा  ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.    बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणा मध्ये तुरळक ठिकाणी येत्या २४ जुलै पर्यंत जोरदार पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात पुढले ७ दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

July 16, 2025 2:44 PM July 16, 2025 2:44 PM

views 8

येत्या दोन ते तीन दिवसांत ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन ते तीन दिवसांत राजस्थान, झारखंड, बिहार, ओदिशा आणि मध्य भारत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण बिहार आणि झारखंडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.   हवामान विभागानं उद्यापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारी, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.