October 13, 2025 7:18 PM October 13, 2025 7:18 PM
70
नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार
नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे. येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.