February 27, 2025 1:31 PM February 27, 2025 1:31 PM
5
उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं – मंत्री पीयूष गोयल
उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उद्योजकांना केलं. मुंबईत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयएमसी भारत कॉलिंग परिषदेचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. अनुदान, उच्च आयात शुल्क अशा सरकारच्या मदतीवर कधीपर्यंत अवलंबून राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला. एक देश म्हणून या सुरक्षित वातावरणातून आणि बचावात्मक पावित्र्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे, नवोन्मेष, उत्पादकता वाढवणं, कौशल्य आणि कार्यक्षमता सुधारणं ...