November 12, 2024 10:14 AM November 12, 2024 10:14 AM

views 8

आयआयटी मुंबई मध्ये साजरा करण्यात आला राष्ट्रीय शिक्षण दिन

भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी मुंबई मध्ये काल राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त निवडक प्राध्यापकांना संशोधन प्रकाशन पुरस्कार आणि प्रभावशाली संशोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रत्येक संशोधन पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, 5000 रुपये रोख पुरस्कार आणि पाच लाख रुपयांचे अंतर्गत संशोधन अनुदान यांचा समावेश आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. यावेळी बोलता...

November 9, 2024 7:35 PM November 9, 2024 7:35 PM

views 8

देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान

देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान मिळालं आहे. त्यात आयआयटी मुंबईला ४८वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी दिल्लीला ४४ वा क्रमांक मिळाला असून आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, भारतीय विज्ञान संस्था, दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश पहिल्या १०० मानांकनात आहे. त्यानंतरच्या ५० मानांकनांमधे आयआयटी गुवाहाटी, आयआयटी रूरकी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, चंडीगढ विद्यापीठ, इत्यादींचा समावेश आहे. आशियातल्या २५ देशांमधल्या ९८४ शैक्षणिक संस्था...

September 7, 2024 2:03 PM September 7, 2024 2:03 PM

views 4

आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी

आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या तीन वर्षातील हा सर्वाधिक निधी असून त्यात खाजगी संस्थांकडून मिळालेल्या निधीचे प्रमाण ३५ टक्के आहे. उर्वरित निधी हा सरकारी संस्थांकडून मिळालेला आहे. देशाला तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आयआयटी मुंबई कटीबद्ध असल्याचं आयआयटीनं म्हटलं आहे.