November 5, 2025 1:41 PM November 5, 2025 1:41 PM
13
QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आशिया विभागात IIT दिल्लीला देशस्तरावर पहिलं स्थान
क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया २०२६मध्ये आयआयटी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं, तर जागतिक स्तरावर ५९वं स्थान मिळवलं आहे. आयआयटी मुंबई १२९व्या, आयआयटी मद्रास १८०व्या, तर आयआयटी खरगपूर २१५व्या स्थानावर आहे. आयआयएमसी बेंगलोरला २१९, तर आयआयटी कानपूर २२२वं स्थान देण्यात आलं आहे. दिल्ली विद्यापीठाचा समावेश पहिल्या ३५० संस्थांमध्ये झाला आहे. यंदाच्या क्रमवारीत देशातल्या ५४ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.