November 26, 2025 7:12 PM November 26, 2025 7:12 PM

views 12

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. याप्रकरणावरुन ते बोलत होते. 

August 23, 2025 7:19 PM August 23, 2025 7:19 PM

views 7

चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे, IIT मुंबई प्रथम

चांद्रयान २ मोहिमेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रसायनांचे नकाशे तयार केले आहेत. इस्रोच्या मदतीनं देशभरातल्या आयआयटींनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी पहिलं स्थान पटकावलं. स्पर्धेत मिळालेल्या यशावर न थांबता या विद्यार्थ्यांनी यावर आणखी विस्तृत संशोधन केलं, ज्याचा उपयोग भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी होणार आहे.   विद्यार्थ्यांनी केलेलं हे संशोधन प्लानेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित होण्याची ...

January 14, 2025 1:21 PM January 14, 2025 1:21 PM

views 6

ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मार्चपासून सुरू होणार

मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ई-मोबिलिटी या विषयातला ऑनलाइन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे. १८ महिन्यांचा हा अभ्यासक्रम ‘ग्रेट लर्निंग’ या संस्थेच्या सहकार्याने आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे. या क्षेत्रात काम करणारे, वैज्ञानिक, संशोधक यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होईल. यात इलेक्ट्रिक वाहनांचं डिझाइन, बॅटरी तंत्रज्ञान यासह इतर विषयांवर लक्ष केंद्रित केलं आहे.