November 15, 2025 8:03 PM

views 41

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना आहे – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. ते आज पणजी इथं आगामी ५६ व्या इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पणजीत इफ्फी महोत्सव रंगणार आहे. या सोहळ्याला ८० देशांतले चित्रपटनिर्माते भेट देणार असून देश विदेशातले २७० हुन अधिक चित्रपट एकत्र येणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल गुरुदत्त, राज खोसला, भानुमती, भुवन, रित्विक तसंच रजनीकांत आणि बालकृष्ण...

November 25, 2024 7:15 PM

views 18

गोव्यात सुरु असलेल्या ईफ्फी चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं दर्शन होत असल्याचं केरेबेटे या कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते गौरीशंकर एसआरजी यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज सुमारे ७५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस  "हाऊ टू सक्सेड इन न्यू हॉलीवूड" या सत्रात सहभागी होणार आहेत. तर अभिनेत्री क्रिती सॅनन आज संध्याकाळी "चित्रपटातला महिलांचा सहभाग" या विषयावर बोलणार आहे. गोव्यात सुरू असले...

November 24, 2024 6:04 PM

views 22

इफ्फी चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी

गोव्यात होत असलेल्या ५५ व्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी होता आहेत. ‘युवा चित्रपट निर्माता- भविष्‍य आताच आहे’ अशी या वर्षीच्या इफ्फीची संकल्पना  आहे. ‘उद्याची सर्जनशील मनं’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ अशा उपक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यासोबतच या महोत्सवात सरकारनं चित्रपट क्षेत्राशी संबंधित चारशेहून अधिक तरुण विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याकरता प्रयत्न केले आहेत.

November 21, 2024 7:39 PM

views 17

इफ्फी चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं उद्घाटन

इफ्फी अर्थात भारतीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं आज उद्घघाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं. याद्वारे तरुण चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रातलं आपलं कौशल्य जगासमोर आणतील. फिल्म बाजारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.   ...