November 29, 2024 1:25 PM

views 21

५५व्या इफ्फीचा गोव्यात दिमाखदार सोहळ्यात समारोप

५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठ...

November 28, 2024 8:33 AM

views 16

५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

November 22, 2024 7:45 PM

views 26

इफ्फी चित्रपट महोस्तवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन उभारण्यात आलं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देशोदेशीचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसंच अधिकारी या  दालनाला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशन करिता लागणाऱ्या परवानगी देणारी फिल्म सेल प्रणाली,कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ कलासेतू पोर्टल आदी गोष्टींचा प्रचार व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्...

November 20, 2024 6:43 PM

views 22

इफ्फी महोत्सवाला महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात

५५वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात होत आहे. संध्याकाळी उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमाचा मूकपटापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास दर्शवणारा कार्यक्रम सादर होईल. ८१ देशातले १८० चित्रपट हे महोत्सवाचं आकर्षण असून  ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित 'बेटर मॅन' या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल

November 6, 2024 7:42 PM

views 28

इफ्फी महोत्सवात भारत आणि दक्षिण आशियातले चित्रपट सादर होणार

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या वीस तारखेपासून गोव्यात  सुरु होत आहे.  हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. फिल्म बझार या उपक्रमात निवड झालेल्या दक्षिण आशियाई चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जागतिक खरेदीदार, विक्री प्रतिनिधी यांच्यासमोर खुल्या सत्रात सादरीकरणाची संधी मिळेल.      २१ ते २४ नोव्हेंबरमध्ये व्हुईंग रुम या उपक्रमात भारत आणि दक्षिण आशियातले  चित्रपट सादर होतील. या चित्रपट निर्मात्यांना उपक्रमातून आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय बाजारपेठेत प्रमोशन...

November 5, 2024 8:26 PM

views 18

इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचेही चित्रपट दाखवणार

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी पुनर्संचयित केलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या दिग्गजांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे...

October 23, 2024 8:40 PM

views 30

इफ्फी महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू

येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे ७ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

October 10, 2024 5:45 PM

views 43

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी चार मराठी चित्रपटांची निवड

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ च्या फिल्म बाजार विभागासाठी चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा काल महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या चित्रपटांमध्ये आत्मपॅम्प्लेट, तेरवं, विषय हार्ड आणि छबिला यांचा समावेश आहे. या चित्रपटांची निवड करण्याकरता मृण्मयी देशपांडे, निपुण धर्माधिकरी, महेश लिमये, अमितराज सावंत, मीना कर्णिक या पाच परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार या चार मराठी चित्रपटांची निवड झाली. गोव्यातल्या ...

September 14, 2024 6:55 PM

views 26

IFFI २०२४ मध्ये तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी नवीन विभाग

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच ईफ्फीमध्ये नवोदित तरुण भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी एक नवीन विभाग सुरू केला आहे. "सर्वोत्कृष्ट नवोदित  भारतीय चित्रपट विभाग २०२४" असे या विभागाचे नाव आहे. या नव्या दालनात ईफ्फी चित्रपट महोत्सव यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होत आहे. या नवोदित दिग्दर्शकांच्या दालनाच्या माध्यमातून  तरुण चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील दृष्टी आणि अनोखा कथा मांडणी दृष्टिकोन अधोरेखित होणार आहे. भारतीय चित्रपटात...