November 26, 2025 3:46 PM November 26, 2025 3:46 PM

views 21

इफ्फीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत आज द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्नेस्टो मार्टिनेझ बुसिओ यांनी केलं असून त्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. या चित्रपटाने यंदाच्या बर्लिनेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. या चित्रपटाच पाच भावंडं आणि त्यांच्या आजीची कथा दाखवण्यात आली आहे.

November 8, 2025 9:46 AM November 8, 2025 9:46 AM

views 29

इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार

गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.   20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून यात 81 देशांतील 240 चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहिती मुरुगन यांनी दिली. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.   महिलांनी दिग्दर्शित केलेले 50हून अधिक चित्रपट हे या वर...

November 22, 2024 7:45 PM November 22, 2024 7:45 PM

views 11

इफ्फी चित्रपट महोस्तवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन उभारण्यात आलं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देशोदेशीचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसंच अधिकारी या  दालनाला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशन करिता लागणाऱ्या परवानगी देणारी फिल्म सेल प्रणाली,कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ कलासेतू पोर्टल आदी गोष्टींचा प्रचार व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्...

November 5, 2024 8:26 PM November 5, 2024 8:26 PM

views 10

इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचेही चित्रपट दाखवणार

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी पुनर्संचयित केलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या दिग्गजांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे...