November 5, 2025 1:27 PM

views 42

अमूल आणि इफको या कंपन्यांना जगातल्या अग्रगण्य सहकारी संस्थांमध्ये स्थान

अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी, जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवलं आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर या संस्थेनं यासंबंधीची २०२५ या वर्षासाठीची यादी अलिकडेच जाहीर केली. त्यात अमूलनं पहिलं तर इफकोनं दुसरं स्थान पटकावलं. दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाअंतर्गतच्या कामगिरीच्या आधारावर या कंपन्यांनी हे यश प्राप्त केलं.   अमूलनं ग्रामीण भागाची आत्मनिर्भरता आणि सामूहिक मालकीच्या भावनेनं काम करत लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे...