June 21, 2025 1:43 PM June 21, 2025 1:43 PM
18
देशोदेशी योगदिन साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिवस देशोदेशी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. युकेमधे लंडन शहरातल्या महत्त्वाच्या स्थळांवर तसंच ऑक्सफोर्ड केंब्रिज आणि साऊदम्टन विद्यापीठांमधे विविध कार्यक्षेत्रातल्या लोकांनी योगदिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतला. आरोग्य, एकाग्रता आणि शाश्वतता या तत्त्वांचं महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम झाल्याचं युकेतले भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअर मधे योगदिन साजरा झाला. जपानमधे टोकियो इथल...