August 19, 2024 12:25 PM August 19, 2024 12:25 PM
10
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं निधन
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचं काल चेन्नई इथं हृदयविकारानं निधन झालं. ते एकोणसाठ वर्षांचे होते. तटरक्षक दलाच्या सागरी प्रतिसाद केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते चेन्नई इथं गेले होते. ३४ वर्षांच्या सेवेदरम्यान त्यांनी तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पाल हे समर्थ आणि कामाशी बांधिलकी असलेले अधिकारी होते, त्यांच्या ने...