January 27, 2025 4:02 PM January 27, 2025 4:02 PM

views 20

स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेट मधे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तिनं १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतल्या २४ सामन्यांमधे मिळून तिने यंदा १ हजार ३५८ धावा पूर्ण केल्या.

January 19, 2025 4:12 PM January 19, 2025 4:12 PM

views 12

महिलांच्या आय सी सी, टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

मलेशियात क्वालालंपूर इथं आज झालेल्या १९ वर्षांखालच्या महिलांच्या आय सी सी, टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं ९ गडी राखून विजय मिळवला आहे.   वेस्ट इंडिजनं १३ षटकं आणि २ चेंडूत ४४ धावा करत भारतासमोर ४५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतान एक गडी गमावत चार षटकं आणि दोन चेंडूतच ही धावसंख्या गाठली. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.

September 25, 2024 8:05 PM September 25, 2024 8:05 PM

views 18

क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या दोन खेळाडूंना पहिल्या दहा खेळाडूत स्थान

कसोटी क्रिकेट फलंदाजी मानांकनात भारताच्या यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत या दोघांनी पहिल्या दहा खेळाडूत स्थान मिळवलं आहे. ७५१ गुणांसह जयस्वालनं पाचवं तर पंतनं ७३१ गुणांसह सहावं स्थान पटकावलं आहे. चेन्नईत बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. 

August 28, 2024 1:00 PM August 28, 2024 1:00 PM

views 8

जय शाह यांची ICCच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते. यावर्षी 1 डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. 35 वर्षांचे शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत. ICC चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्यांदा हे पद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.  यावर्षी नोव्हेंबर मध्ये ते सेवानिवृत्त होतील.

July 10, 2024 3:12 PM July 10, 2024 3:12 PM

views 11

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहनं १५ गडी बाद केले. महिला क्रिकेटपटू स्मृती मान्धना हिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. तिनं इंग्लंडच्या माईया बौशेअर आणि श्रीलंकेच्या विश...