October 30, 2025 3:29 PM October 30, 2025 3:29 PM

views 243

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.    गोहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ५० षटकांत सात खेळाडू  गमावत ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १९४ धावांवर ...

October 26, 2025 8:18 PM October 26, 2025 8:18 PM

views 144

Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला.    या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.