November 1, 2025 7:32 PM November 1, 2025 7:32 PM
103
ICC Women World Cup : भारत – दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना
आयसीसी एकदिवसीय महिला क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईत अंतिम सामना रंगणार आहे. दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात होईल. गुवाहाटी इथं झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा १२५ धावांनी एकतर्फी पराभव केला तर गुरुवारी डी वाय पाटील स्टेडियम इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजयासाठी दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जच्या झुंजार शतकाच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला.