November 25, 2025 8:36 PM November 25, 2025 8:36 PM

views 20

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२६, ७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी आज या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारतात पाच ठिकाणी, तर श्रीलंकेत ३ ठिकाणी या स्पर्धेचे सामने होतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा समावेश, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह अ गटात करण्यात आला आहे. भारतीय फलंदाज रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड ॲम्बॅसिडर असेल. 

November 27, 2024 8:22 PM November 27, 2024 8:22 PM

views 16

ICC कसोटी क्रिकेट गोलंदाजी मानांकनात जसप्रित बुमराह पुन्हा अग्रस्थानी

ICC,अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या मानांकनात भारताच्या जसप्रित बुमराहनं पुन्हा अग्रस्थान पटकावलं आहे. पर्थ इथं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात  केलेल्या कामगिरीमुळे बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला, तसंच दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हैजलवुडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. पर्थ कसोटीत बुमराहनं ८ गडी बाद केले होते. 

October 3, 2024 1:38 PM October 3, 2024 1:38 PM

views 7

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजाह इथं सुरुवात

महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंडचा संघ यांच्यात होणार आहे . सामन्याला दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आहेत. या स्पर्धेत मागील तिनही वेळा ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. यंदा मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये ...

July 18, 2024 5:34 PM July 18, 2024 5:34 PM

views 12

आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट जागतिक मानांकनं जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने यंदाची पुरुष टी ट्वेंटी ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून आठव्या स्थानावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, हार्दिक पंड्या हा टॉप टेन मधला एकमेव भारतीय खेळाडू आहे, तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा यानं आपलं...