February 25, 2025 2:45 PM February 25, 2025 2:45 PM

views 13

ICC Champions Trophy : आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तानमध्ये रावळपिंडी मैदानावर होणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. याच स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. अ गटात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये, दोन विजयांसह भारत आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी ...

February 25, 2025 9:57 AM February 25, 2025 9:57 AM

views 10

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तानमधल्या रावळपिंडी इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नजमुल हुसेन शांतोच्या ७७ धावांच्या खेळीमध्ये बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३६ धावा केल्या.प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं ४६ षटकं आणि १ चेंडूत ५ बाद २४० धावा केल्या. न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेलनं ४ बळी घेतले तर रचिन रवींद्रनं सर्वाधिक ११२ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलला सामनावीर घोषित करण्यात आले. या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलाद...

February 23, 2025 7:29 PM February 23, 2025 7:29 PM

views 11

ICC Champions Trophy : पाकिस्तानचं भारतापुढं विजयासाठी २४२ धावांचं आव्हान

आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढं विजयासाठी २४२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.  पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सोद शकीलनं सर्वाधिक ६२ धावा, तर कर्णधार महंमद रिझवाननं ४६ धावा केल्या. खुशदिल शाहानं ३८ धावांच योगदान दिलं. भारतातर्फे कुलदीप यादवनं ३, तर  हार्दिक पंडयानं २ गडी बाद केले.

February 19, 2025 9:03 PM February 19, 2025 9:03 PM

views 21

९व्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात

नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांत सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या बिनबाद ३९  धावा झाल्या आहेत.   दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दुबईत खेळले जाणार आहेत. रोहीत शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.