March 10, 2025 1:08 PM March 10, 2025 1:08 PM

views 14

विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत

महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चँपियन्स ट्राफी २०२५ मध्ये अजिंक्य पद पटकाविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह संघातल्या सर्व खेळाडूंचं सभागृहाने  अभिनंदन केलं.

March 10, 2025 8:56 AM March 10, 2025 8:56 AM

views 8

१२ वर्षांनंतर ICC करंडकवर कोरलं भारताचं नाव

आयसीसी चँपिअन्स क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं काल १२ वर्षानंतर करंडक मिळवला. दुबई इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत एकमेव देश ठरला आहे.   न्यूझिलंडनं दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. पहिला गडी बाद होण्यापूर्वी शुभमन गील आणि रोहित शर्मानं १०५ धावांची भागीदारी केली.  विजयासाठी श्रेयस, राहुल आणि अक्षर पटेल यांची कामगिरी महत्वाची ठरली. कर्णधार रोहित शर्माला सामनावीर घोषित कर...

March 6, 2025 10:03 AM March 6, 2025 10:03 AM

views 7

ICC Champions Trophy : न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी हरवून भारताविरुद्ध अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडने दिलेल्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 312 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने 100 धावा काढल्या, तर रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने 69 धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमाने 56 धावा केल्या.   न्यूझीलंडकडून कर्णधा...

March 5, 2025 8:37 PM March 5, 2025 8:37 PM

views 16

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोर इथं  सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ३६२ धावा केल्या. रचिन रवींद्र,  आणि केन विल्यमसन यांनी १७४ धावांची भागीदारी केली. रवींद्रनं १०८ तर विल्यमसननं १०२ धावा केल्या. डॅरिल मिचेल, आणि ग्लैन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९ धावांचं योगदान दिलं.    विजयासाठी मोठया लक्ष्याच...

March 5, 2025 9:48 AM March 5, 2025 9:48 AM

views 11

ICC Champions Trophy : भारताची अंतिम फेरीत धडक

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 264 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात हे उद्दिष्ट पार केलं.   विराट कोहलीने संयमी 84 धावा केल्या तर श्रेयस अय्यरच्या 45 , के एल राहु...

March 4, 2025 8:01 PM March 4, 2025 8:01 PM

views 10

ICC Champions Trophy : ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र सामन्यातले ३ चेंडू बाकी असताना त्यांचा डाव २६४ धावांवर संपला.  कर्णधार स्टीव्हन स्मिथनं सर्वाधिक ७३, तर  ॲलेक्स कॅरेनं ६१ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे मोहम्मद शमीनं ३, तर वरुण चक्रवर्ती आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.     शेवटची बातमी हाती आली...

March 1, 2025 9:11 PM March 1, 2025 9:11 PM

views 9

ICC Champions : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज ‘ब’ गटातल्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला.    दरम्यान, ‘अ’ गटातला शेवटचा साखळी सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार असून या दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठली असल्यानं हे दोन्ही संघ उद्याचा सामना अंतिम फेरीचा सराव सामना म्हणून औपचारिकरित्या खेळण्याची शक्यता आहे.   

February 28, 2025 7:14 PM February 28, 2025 7:14 PM

views 8

ICC Champions Trophy : अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून २७३ धावा केल्या. सादीकुल्लाह अटलनं ८५, अजमतुल्ला उमरझईनं ६७ धावा केल्या, ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशुइसनं ३, तर स्पेन्सर जॉन्सन आणि अ‍ॅडम झांपा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.    शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ षटकात १बाद ६४ धावा झ...

February 27, 2025 9:23 AM February 27, 2025 9:23 AM

views 6

चँपियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची इंग्लंडवर ८ धावांनी मात

आयसीसी पुरुषांच्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 326 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद 317 धावा करु शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतील विक्रमी 177 धावा केल्या. या पराभवामुळं इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. स्पर्धेत अद्याप खातं उघडू न शकलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील अंतिम गट सामना आज रावळपिंडी इथं होणार आहे.

February 26, 2025 12:32 PM February 26, 2025 12:32 PM

views 9

ICC Champions Trophy : आज इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यात लढत

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणीस्तान यांच्यात पाकिस्तानात लाहोर इथं  लढत होणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात पराभूत झालेला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ सध्या गट ब च्या गुणतालिकेत तळाला आहेत.  दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल रावळपिंडी इथं होणारा सामना पावसामुळे रद्द झाला.  दोन्ही संघांना याचा प्रत्येकी एक गुण मिळणार आहे.