February 21, 2025 2:40 PM February 21, 2025 2:40 PM
7
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानात कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.भारतानं काल बांगलादेशवर ६ गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला प्रत्युत्तर देताना ४७ व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रोहित शर्मानं ४१ तर विराट कोहलीनं २२ धावा काढल्या.