November 2, 2025 2:37 PM November 2, 2025 2:37 PM

views 2.2K

Womens ODI Cricket: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल.  नवी मुंबईतल्या  डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुरुवारी नवी मुंबई मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर गुवाहाटी इथं  झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत  दक्षिण आफ्रिकेनं  इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम फेरीत खेळत आ...

October 12, 2025 1:50 PM October 12, 2025 1:50 PM

views 226

महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथं भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री, कोलंबो इथल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ८९ धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.  

June 10, 2025 3:46 PM June 10, 2025 3:46 PM

views 22

महेंद्रसिंह धोनी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये विराजमान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीनं क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलं आहे. या वर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. कठीण परिस्थितीत असामान्य नेतृत्व करण्याची क्षमता आणि खेळातलं अद्भुत कौशल्य यासाठी धोनीची निवड या सन्मानासाठी केल्याचं आयसीसीनं म्हटलं आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणं, ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंह धोनीनं दिली आहे.

June 1, 2025 5:06 PM June 1, 2025 5:06 PM

views 18

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जूनपासून नवीन नियम लागू

कसोटी क्रिकेट आणि मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी जून महिन्यापासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय़ आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतला आहे.  यात एकदिवसीय सामन्यांमधे नवीन चेंडूचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे.  सध्या एकदिवसीय सामन्यात प्रत्येक डावासाठी दोन नवीन चेंडू वापरले जातात. नव्या नियमानुसार ३४ षटकांपर्यंत दोन चेंडू वापरले जातील. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ डावाच्या शेवटी एक चेंडू निवडेल.

May 17, 2025 2:00 PM May 17, 2025 2:00 PM

views 20

आयसीसीचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांसंदर्भात सुरु असलेल्या चौकशीदरम्यान त्यांनी राजीनामा दिला आहे.   खान यांच्यावर आपल्या महिला सहकाऱ्याबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. खान यांनी हे आरोप अमान्य केले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत खान रजेवर असतील असं आयसीसी नं सांगितलं आहे. करीम खान यांच्या गैरहजेरीत  उप अभियोक्ता कार्यालयाचं कामकाज पाहतील. 

March 1, 2025 3:37 PM March 1, 2025 3:37 PM

views 17

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला, तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते. 

March 1, 2025 10:34 AM March 1, 2025 10:34 AM

views 35

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.   अफगाणिस्तान संघानं दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलिया संघानं 12 षटकं आणि 5 चेंडूंत 109 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ गट अ विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

February 22, 2025 2:51 PM February 22, 2025 2:51 PM

views 2

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर इथं हा सामना होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत काल कराची इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला.   या सामन्यात पहिली फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं, रायन रिकेल्टन याच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या पहिल्या शतकाच्या जोरावर ६ बाद ३१५ धावा केल्या. मात्र विजयासाठी ३२६ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान...

February 14, 2025 2:41 PM February 14, 2025 2:41 PM

views 559

आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेत ५३% वाढ

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बक्षिसाच्या रकमेत ५३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे या करंडक विजेत्या संघाला २० लाख २४ हजार अमेरिकन डॉलर्सची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत.   तर उपविजेत्या संघाला १० लाख १२ हजार अमेरिकन डॉलर्स किमतीची बक्षिसं दिली जातील. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत.

January 27, 2025 7:19 PM January 27, 2025 7:19 PM

views 491

जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि स्मृती मानधनाला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.   पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमधे अर्शदीप सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. जसप्रीत बुमराने गेल्या वर्षभरात १३ कसोटी सामन्यात ३५७ षटकात ७१ बळी मिळवले. भेदक यार्करचा मारा आणि सातत्यपूर्ण खेळ ही त्याच्या यंदाच्या कामगिरीची वैशिष्ट्...