May 9, 2025 1:33 PM May 9, 2025 1:33 PM
3
ICAI संस्थेनं परिक्षा पुढे ढकलल्या…
देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेने आपल्या काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आजपासून येत्या १४ मे पर्यंत होणाऱ्या सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्युल या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या असून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असं संस्थेने आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे कळवलं आहे.