April 16, 2025 9:34 AM April 16, 2025 9:34 AM

views 8

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत...

September 13, 2024 12:29 PM September 13, 2024 12:29 PM

views 8

प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात करार

आधुनिक उपकरणं, संकरीत तंत्रज्ञान प्रणाली, गतिशीलता, उद्योग, ऊर्जा आणि सर्व्हर सारख्या क्षेत्रात प्रगत प्रोसेसर सह-विकसित करण्यासाठी आयबीएम आणि एल अँड टी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यांच्यात काल करार झाला. केंद्रीय  माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. ही भागीदारी जागतिक बाजारपेठांसाठी स्पर्धात्मक उत्पादने तयार करून भारताच्या सेमीकंडक्टर क्षमतांना चालना देईल, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.