October 22, 2025 8:12 PM October 22, 2025 8:12 PM

views 11

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष मोहीम ५.० अंतर्गत स्वच्छता मोहीम

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विशेष मोहीम ५.० अंतर्गत ४९३ मोहिमा राबवून ९७३ ठिकाणं आणि १०४ वाहनांची स्वच्छता केली आहे. या मोहिमेदरम्यान, १ लाख ४३ हजार किलो भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली. त्यातून ४३ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला असून ८ हजार चौरसफुटापेक्षा जास्त जागा मोकळी झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.