September 11, 2025 6:44 PM September 11, 2025 6:44 PM

views 14

तिन्ही सेनादलातल्या १० महिला अधिकाऱ्यांच्या सागरीमार्गे होणाऱ्या जगप्रदक्षिणेला मुंबईतून सुरुवात

लष्कर, नौदल आणि हवाई दलातल्या महिला अधिकाऱ्यांच्या सागरीमार्गे होणाऱ्या पहिल्यावहिल्या जगप्रदक्षिणेला आज मुंबईतून सुरुवात झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दूरस्थ पद्धतीनं IASV त्रिवेणी या शिडाच्या नौकेवरच्या मोहिमेला रवाना केलं.   लष्करातल्या लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर या १० अधिकाऱ्यांच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत. २६ हजार १०० नॉटिकल मैलांपेक्षा जास्त प्रवास पुढच्या वर्षी मे महिन्यात मुंबईत परतण्याचं त्यांचं नियोजन आहे.