July 18, 2024 7:21 PM July 18, 2024 7:21 PM

views 11

मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

July 18, 2024 3:37 PM July 18, 2024 3:37 PM

views 17

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला  होता. तेव्हापासून मनोरमा  फरार होत्या.

July 17, 2024 10:08 AM July 17, 2024 10:08 AM

views 11

वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं जारी केला आहे.   तसंच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी इथं अकादमीत बोलवण्यात आलं आहे. अकादमीनं महाराष्ट्र शासनाला यासंदर्भात पत्र पाठवलं आहे, त्यानुसार राज्य शासनानं खेडकर यांना जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त केलं असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काल दिली.