April 16, 2025 1:27 PM April 16, 2025 1:27 PM

views 13

हैद्राबादमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीची कारवाई

मनी लाँडरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आज हैद्राबादमध्ये अनेक ठिकाणी कारवाई करत आहे. सुराणा समूह आणि साई सूर्या विकासकांशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहेत. प्रकल्पांची कामं वेळेवर पूर्ण करुन ताबा देण्यात अपयश आल्याबद्दल या उद्योजकांविरुद्ध गुन्हे नोंदण्यात आले आहेत. 

February 24, 2025 1:46 PM February 24, 2025 1:46 PM

views 10

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न

हैदराबादमध्ये SLBC बोगद्यात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंडात झालेल्या अपघातातल्या मजूरांची सुटका करणारे रॅट मायनर्स सुद्धा आ्ल्याचं तेलंगणाचे मंत्री जे कृष्णराव यांनी सांगितलं.  बोगदा कोसळून दोन दिवस झाले आहेत आणि बोगद्याच्या तोंडाशी दगडमातीचा ढिगारा झाल्याने अडकलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचणं कठीण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तरीही खोदकाम करणाऱ्या मशिनच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ...