October 9, 2024 8:25 PM October 9, 2024 8:25 PM
3
अमेरिकेत मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा
अमेरिकेत फ्लोरिडाच्या पश्चिम किनारपट्टीवर मिल्टन चक्रिवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टीवरच्या रहिवाशांना तिथून दूर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला जर्मनी आणि अंगोला या देशांचे नियोजित दौरे पुढे ढकलले आहेत. हे चक्रिवादळ पाच क्रमांच्या श्रेणीचं असून या वादळामुळे किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे फ्लोरिडाला जाणारी अनेक उड्डाणं रद्द झाली आहेत.