December 10, 2024 1:32 PM
10
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त राजभवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन
जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती एन. एच. पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य मानवाधिकार आयोगाच्या वर्ष २०२४च्या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं. यानंतर सात विविध अतिसंवेदनशील घटकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणाऱ्या सत्रांचं आयोजन या कार्यक्रमात केलं आहे. पद्मश्री शंकर पापळकर ...