December 1, 2025 8:37 PM

views 41

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, संगीत, कला आणि अन्नसंस्कृतीचा आनंद लुटतात. या महोत्सवात यावर्षी युनायटेड किंगडम, आयर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, माल्टा आणि स्वित्झर्लंड हे सहा भागीदार देश आहेत.

November 21, 2025 7:53 PM

views 26

हॉर्नबील महोत्सवाचा भागीदार देश म्हणून सामील होण्यास फ्रांसचा होकार

नागालँडमधल्या यंदाच्या हॉर्नबील महोत्सवाचा भागीदार देश म्हणून सामील होण्यासाठी फ्रांसनं होकार दिला आहे. फ्रान्सची संस्कृती तसंच सर्जनशीलतेमुळं यंदाच्या हॉर्नबील महोत्सवाची शोभा वाढणार असून संस्कृती, गुंतवणूक तसंच नवोन्मेष क्षेत्रातल्या पारस्परिक सहकार्यात वाढ होणार असल्याचं नागालँडचे मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी म्हटलं आहे. या महोत्सवात ऑस्ट्रिया, माल्टा, इंग्लंड, आयर्लंड तसंच स्वित्झर्लंड हे देशही या महोत्सवाचे भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहेत.