November 27, 2025 7:42 PM November 27, 2025 7:42 PM
1
हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत ६५ जणांचा मृत्यू
हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ६५वर गेला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत ७० जण जखमी झाले आहेत. तर एकंदर २७९ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी दिली आहे. आग विझवायचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या संकुलातल्या आठपैकी सात इमारतींना काल आग लागली होती. यापैकी तीन इमारतींमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. सुमारे ९०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.