November 14, 2024 8:14 PM November 14, 2024 8:14 PM
10
राज्यात गृहमतदानाला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमधले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांसाठी आजपासून गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कुवारबाव इथे राहणाऱ्या ९२ वर्षं वयाच्या मतदार जयश्री नाईक यांनी गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य बजावलं. तसंच ८८ वर्षांचे शांताराम देशपांडे यांनीही गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व १० विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला आज सुरूवात झाली. वयोवृद्ध म...