October 22, 2025 1:26 PM October 22, 2025 1:26 PM

views 31

लडाखमधल्या नेत्यांशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीची चर्चा

केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चाधिकार समिती आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा करत आहे.  गेल्या महिन्यात लडाखमधे झालेल्या हिंसाचारानंतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा होत आहे. याचर्चेत लडाखचं शिष्टमंडळ राज्याचा दर्जा आणि सहाव्या सूचीत समावेश यासारख्या मागण्या मांडण्याची शक्यता असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  या चर्चेत  कारगिल लोकशाही आघाडी, लेहमधल्या आंदोलनकर्त्यांच्या शिखर संस्थेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  

June 20, 2024 8:34 PM June 20, 2024 8:34 PM

views 8

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारचं निवेदन

देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही आज सरकारनं दिली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तूंच्या दराचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. रब्बी हंगामात १८ जून २०२४ पर्यंत २६६ लाख मेट्रिक टन तर २०२३मध्ये २६२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गव्हाच्या दरावर बारकाईनं लक्ष्य देऊन देशातल्या ग्राहकांसाठी स्थिर दराची ग्वाही मिळावी यासाठी योग्य तो ध...