December 13, 2025 8:14 PM December 13, 2025 8:14 PM

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या ५ वर्षात देशातला सर्वात विकासित आदिवासी क्षेत्र ठरेल यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या २ वर्षात दोन हजारापेक्ष...

December 13, 2025 1:16 PM December 13, 2025 1:16 PM

views 3

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधे महत्त्वपूर्ण बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ मध्ये रायपूर इथं महत्त्वपूर्ण बैठक घेणार असून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर अमित शाह बस्तर ऑलिंपिकच्या सांगता समारंभात देखील सहभागी होणार आहेत. 

December 7, 2025 8:13 PM December 7, 2025 8:13 PM

views 11

अहमदाबादमध्ये गृहमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. अहमदाबादच्या थलतेज परिसरातल्या ८६१ घरांचं त्यांनी उद्घाटन केलं. दक्षिण बोपलमध्ये इलेक्ट्रोथर्म कंपनीनं अहमदाबाद महानगरपालिकेच्या सहकार्यानं विकसीत केलेल्या इलेक्ट्रोथर्म बागेचं, शाह यांनी उद्घाटन केलं. याशिवाय, सरखेज आणि वस्त्रपूर इथं तलाव, मेमनगर इथं पार्टी भूखंड आणि नवा वडाज इथल्या साडेतीनशे घरांचं उद्घाटन केलं. न्यू रणीप इथली व्यायामशाळा आणि वाचनालयाला भेट दिल्यानंतर त्यांन...

November 6, 2025 8:27 PM November 6, 2025 8:27 PM

views 19

केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला सहकार कुंभचं उद्घाटन करणार

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला नवी दिल्लीत सहकार कुंभ २०२५ या शहरी सहकारी पतक्षेत्रावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रीय शहरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या महासंघाच्या अध्यक्षा लक्ष्मी दास यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वप्नांचं डिजिलायझिंग - समुदायांचं सशक्तीकरण ही या दोन दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत डिजिटल नवोपक्रम, प्रशासन सुधारणा आणि सहकारी चळवळीतल्या महिला तसंच युवांचं सक्षमीकरण या विषयांवर चर्चा होईल.

October 5, 2025 1:43 PM October 5, 2025 1:43 PM

views 47

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते अहिल्यानगर मध्ये प्रवरानगर इथं डॉ. विठ्ठलटाव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा झाला.  तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि  लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं  अनावरण झालं.  याशिवाय देशातला  पहिला सहकारी कॉम्प्रेस बायो गॅस  प्रकल्प आणि  स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचं उदघाटन देखील त्यांच्या हस्ते झालं.     ...

October 4, 2025 8:15 PM October 4, 2025 8:15 PM

views 28

३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा अमित शाह यांचा पुनरुच्चार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या संकल्पाचा आज पुनरुच्चार केला. छत्तीसगडच्या जगदालपूर इथे बस्तर दसरा लोकोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. नक्षलवादाच्या समस्येमुळे बस्तर भाग अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.  पारंपरिक मुरिया दरबारमध्येही  ते सहभागी झाले.    आज त्यांच्या हस्ते २५० दुर्गम गावांसाठी ३४ मार्गा...

September 29, 2025 9:31 AM September 29, 2025 9:31 AM

views 14

जम्मूकाश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

ईशान्य क्षेत्र आणि जम्मू-काश्मीर विकास आणि शांततेच्या मार्गावर प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 'नक्षलमुक्त भारत: लाल दहशतवादाचा अंत' या राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. सरकारनं संवाद, सुरक्षितता आणि समन्वय या तीन प्रमुख तत्वांवर काम केलं आहे. परिणामी 2004 ते 2014 या दशकाच्या तुलनेत 2014 ते 2024 दरम्यान ईशान्येकडील सैन्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूंमध्ये 70 टक्के घट झाली आहे. याच काळात या प्रदेशात हिंसाचारामुळं होणाऱ्या नागरिकांच्य...

July 19, 2025 5:44 PM July 19, 2025 5:44 PM

views 11

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उत्तराखंडमधे विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उत्तराखंडमध्ये रुद्रपूर इथं उत्तराखंड सरकारच्या १ हजार २७१ कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी केली. रुद्रपूर इथं आयोजित ‘उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव २०२५’ मध्ये त्यांनी देशभरातले  गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी संवाद साधला. उत्तराखंड सारख्या छोट्या राज्यांच्या प्रगतीशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, म्हणूनच केंद्रसरकार लहान राज्य आणि पूर्वेकडच्या राज्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचं ते यावेळी म्हणाले.    उत्तराखंडचे मुख्यमंत...

June 22, 2025 7:53 PM June 22, 2025 7:53 PM

views 9

नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा सरकारचा संकल्प – गृहमंत्री अमित शाह

सुसंस्कृत समाजात हिंसा आणि दहशतवादाला स्थान नाही, सरकारने नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचा संकल्प  केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. अमित शहा दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. नवा रायपूर मधे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी आणि सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीच्या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत  होते.   सुरक्षा दलं ज्याप्रकारे मोहिमा राबवत आहेत त्यानुसार नक्षलवादमुक्त भारताचं उद्दिष्ट पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा विश्व...

June 15, 2025 6:09 PM June 15, 2025 6:09 PM

views 10

पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल-गृहमंत्री अमित शहा

पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. लखनऊ इथे पोलीस कॉन्स्टेबल नियुक्तीपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. एकेकाळी ११ राज्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता फक्त तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, असंही शहा यावेळी म्हणाले. देशातल्या पोलीस दलाचं आधुनिकीकरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. उत्तर प्रदेशात त्याची सुरुवात २०१७मध्ये झाल्याचंही शहा यावेळी म्हणाले.