March 11, 2025 10:27 AM March 11, 2025 10:27 AM

views 2

होळीच्या सणासाठी उत्तर रेल्वेकडून 400 हून अधिक विशेष गाडी फेऱ्या सुरू

होळीच्या सणासाठी उत्तर रेल्वे 400 हून अधिक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. गरज भासल्यास आणखी विशेष गाड्या चालवल्या जातील, असं उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं.   राष्ट्रीय राजधानीतील नवी दिल्ली, आनंद विहार आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सुरक्षा व्यवस्था, मिनी कंट्रोल रूम आणि प्रतीक्षालयांची स्थापना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.