March 12, 2025 7:11 PM March 12, 2025 7:11 PM

views 12

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या मानापमानावरून होनारे वाद मिटवण्यात पोलिसांना यश

रत्नागिरी जिल्ह्यातल्या २४ गावांमध्ये शिमगोत्सवाच्या मानापमानावरून काही वाद होत होते, मात्र पोलिसांनी पुढाकार घेतल्याने २४ पैकी १९ गावांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलं आहे.   अन्य गावांमध्येही वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.