December 5, 2025 8:35 PM December 5, 2025 8:35 PM

views 10

JWC 2025: भारताची आयर्लंडवर ४-० अशी मात

महिलांच्या एफआयएच हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारतानं क गटातल्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडवर ४-० अशी मात केली. पूर्णिमा यादव हिचे दोन गोल्स आणि कनिका सिवाच आणि साक्षी राणा यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकून क गटात पहिलं स्थान मिळवलं. भारतानं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आता, उपांत्य फेरीत भारताला स्थान मिळणार की नाही, हे राहिलेल्या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून आहे.

November 30, 2025 3:11 PM November 30, 2025 3:11 PM

views 13

भारतीय हॉकी संघाचीसुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारतीय हॉकी संघानं सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमशी  होणार आहे. दरम्यान ,चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट  विश्वचषक स्पर्धेत भारताने काल ओमानवर १७-० असा दणदणीत विजय मिळवला. भारताने दोन सामन्यांत एकंदर २४ गोल करून गट ब मध्ये आघाडी घेतली असून भारताचा पुढील सामना  स्वित्झर्लंडविरुद्ध होणार आहे.

November 17, 2024 11:52 AM November 17, 2024 11:52 AM

views 10

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार आहे. भारतीय महिला खेळाडूंनी आशयाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजयाची घोडदौड सुरू ठेवत चीन ला 3-0 नं हरवून सलग चौथ्यान्दा विजय प्राप्त केला आहे. जपाननं मलेशिया ला 2-1 असं हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपला पहिला विजय निश्चित केला आहे. बिहार मधील राजगीर मैदानावर संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी हा सामना सुरू होईल.

October 19, 2024 2:11 PM October 19, 2024 2:11 PM

views 19

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार

मलेशिया इथं होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाचा पहिला सामना आज जपानशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपासून हा सामना सुरू होत आहे. भारताची लढत २० ऑक्टोबरला ग्रेट ब्रिटनशी, २२ ऑक्टोबरला मलेशियाशी आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सांघिक लढतींतील भारताचा अखेरचा सामना २५ ऑक्टोबरला न्यूझिलंडविरुद्ध होणार आहे.