October 24, 2024 8:18 PM October 24, 2024 8:18 PM

views 7

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं गमावली

जर्मनी विरुद्धची हॉकी मालिका भारतानं आज गमावली. नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या दुसऱा सामन्यात भारतानं ५-३ असा विजय मिळवला. कालचा सामना भारतानं गमावल्यानं दोन्ही देश १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळं मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. त्यात भारतीय खेळाडूंना केवळ १ गोल करता आला, जर्मनीनं ३ गोल केले.

October 24, 2024 1:28 PM October 24, 2024 1:28 PM

views 17

हॉकी : भारतीय पुरुष संघाचा सामना जर्मनीशी होणार

भारतीय पुरुष हॉकी संघाचा सामना आज दुपारी दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर जर्मनीशी होणार आहे. सामन्याला दुपारी दोन वाजता सुरूवात होईल. पहिल्या सामन्यात भारताला जर्मनीविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. जर्मनीकडून चौथ्या मिनिटाला हेन्रीक मर्टगेन्स आणि ३०व्या मिनिटाला कर्णधार लुकास विंडफेडरनं विजयी गोल केले.

October 23, 2024 2:28 PM October 23, 2024 2:28 PM

views 16

भारत आणि जर्मनी यांच्यातील हॉकी मालिकेला आज नवी दिल्लीत सुरुवात होणार

भारत आणि जर्मनी यांच्यात हॉकीच्या मालिकेला आजपासून दिल्लीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामना दुपारी तीन वाजता सुरु होईल. हॉकी इंडियानं डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.   डीडी स्पोर्ट्सवर सामन्याचं थेट प्रक्षेपण चाहत्यांना पाहता येणार आहे. एका दशकानंतर राजधानीत आंतरराष्ट्रीय हॉकीची मालिका रंगणार असून हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.

October 20, 2024 1:44 PM October 20, 2024 1:44 PM

views 21

हॉकी : जोहोर सुलतान विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा जपानवर ४-२ असा विजय

हॉकीमध्ये भारताच्या कनिष्ठ पुरुष संघानं जोहोर सुलतान २०२४ विश्वकरंडक स्पर्धेत जपानच्या संघाचा ४-२ असा पराभव केला. मलेशियातील तमन दाया हॉकी मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. आमीर अली, गुरज्योतसिंग, आनंद सौरभ कुशवाहा आणि अंकित पाल यांनी भारतासाठी गोल केले. हॉकीपटू पी. आर. श्रीजेश या संघाचा प्रशिक्षक आहे. भारतीय संघाचा सामना आज दुपारी ब्रिटनच्या संघाशी होत आहे.

October 6, 2024 7:27 PM October 6, 2024 7:27 PM

views 26

हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर

मलेशियात होणाऱ्या बाराव्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर झाला आहे. या संघाचा कर्णधार अमिर असून उप कर्णधार रोहित असेल. तर पी आर श्रीजेश हे मुख्य प्रशिक्षक असतील.   भारतीय संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी जपानशी होणार असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ब्रिटनशी लढत देईल. २२ ऑक्टोबरला मलेशिया आणि २३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी भारतीय संघाचा सामना होणार आहे.

September 30, 2024 9:42 AM September 30, 2024 9:42 AM

views 8

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून आरंभ

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 च्या चौदाव्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधील रांची इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी होत असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीचे सामने 7 ऑक्टोबर 2024 रोजी खेळले जाणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 9 ऑक्टोबर रोजी होतील. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत एकमेकांशी लढणार असून उपांत्य फेरीतील पराभूत संघ 10 ऑक्टोबर रोजी कांस्यपदकासाठी एकमेकांशी लढणार आहेत.

September 16, 2024 9:59 AM September 16, 2024 9:59 AM

views 9

चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रिडा प्रोत्साहन मंडळ संघाला जेतेपद

  पुण्यात झालेल्या वरिष्ठ पुरुष गटाच्या चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने विजेतेपद राखलं. सलग दुसऱ्यांदा त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. गेल्या वेळी उपविजेता ठरलेल्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाचा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पेनल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला.   सुमीत कुमार, शिलानंद लाक्रा तसंच कर्णधार देविंदर वाल्मिकीने गोल केले. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सेवा क्रीडा नियामक मंडळ संघाने भा...

September 14, 2024 9:45 AM September 14, 2024 9:45 AM

views 12

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांत सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघाने चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया संघांना नमवून गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुणतालिकेत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.

September 12, 2024 7:08 PM September 12, 2024 7:08 PM

views 18

आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत भारताचा कोरियाला पराभव करत सलग चौथा विजय

चीनच्या हुलनबुइर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला जिंकले. भारतानं दक्षिण कोरियाचा ३-१ अशा गोलफरकानं पराभव केला. अराईजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार  हरमनप्रीत सिंगच्या यांनी भारतासाठी गोल केले.  काल मलेशियाचा ८-१ असा दणदणीत पराभव करत, याआधीच भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. गुणतालिकेतले पहिले चार संघ १६ सप्टेंबरला उपांत्य सामने खेळतील, तर अंतिम सामना १७ तारखेला होईल. भारतानं या स्पर्धेचं ...

September 11, 2024 8:32 PM September 11, 2024 8:32 PM

views 23

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.