March 31, 2025 7:27 PM March 31, 2025 7:27 PM

views 32

बिहारमध्ये पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार

बिहारमध्ये हॉकी इंडियाच्या सहकार्याने १२व्या  पुरुष हॉकी हिरो आशिया कप २०२५ चं आयोजन करण्यात येणार आहे. पाटण्यामध्ये हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण (बीएसएसए)  यांच्यात आज  एक सामंजस्य करार झाला. ही  स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान आयोजित केली जाणार आहे.  दक्षिण कोरिया, भारत आणि पाकिस्तान यासारख्या आशियातील विविध देशातले  एकूण आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 

February 21, 2025 9:51 AM February 21, 2025 9:51 AM

views 16

FIH Pro League :- मध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर

एफ आय एच हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर भुवनेश्वर मधल्या कलिंगा हॉकी मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी सव्वापाच वाजता सुरू होणार आहे.   या स्पर्धेत सलीमा टेटेच्या नेतृत्वातील भारतीय संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.भारतीय पुरुष संघाचा सामना याच मैदानावर आयर्लंडशी होणार आहे.हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ ४ सामन्यांतून ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

December 28, 2024 3:22 PM December 28, 2024 3:22 PM

views 7

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार

भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार आहे. आरंभिक सामन्यांमध्ये आज दिल्ली एसजी पायपर्सचा सामना गोनासिका संघाशी होईल. या स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. साखळी फेरीतला अंतिम सामना येत्या १ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

December 15, 2024 1:42 PM December 15, 2024 1:42 PM

views 14

महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवून भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक

ओमान इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत, भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल जपानच्या संघाचा ३-१ असा पराभव करत संघानं अंतिम फेरी गाठली. भारताच्या दीपिकानं २ तर मुमताजनं १ गोल केला. उपांत्य फेरीचा दुसरा सामना चीन आणि दक्षिण कोरिया दरम्यान होणार असून, त्यातील विजेत्या संघाशी अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना होणार आहे.

December 8, 2024 3:25 PM December 8, 2024 3:25 PM

views 25

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला.   अ गटात झालेल्या इतर सामन्यात मलेशियानं थायलंडला ३-० असं पराभूत केलं. ब- गटातल्या सामन्यात जपाननं श्रीलंकेचा १५-० नं पराभव केला. पुढच्या ...

December 1, 2024 3:17 PM December 1, 2024 3:17 PM

views 20

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून, सध्या भारत गुणतालिकेत ९ गुणांसह आघाडीवर आहे. काल झालेल्या सामन्यांत भारतानं भारतानं चिनी तायपेईचा १६ - ० असा पराभव केला, तर दक्षिण कोरियाला जपानकडूडन २-० असा पराभव पत्कारावा लागला. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ४ डिसेंबरल...

November 29, 2024 1:31 PM November 29, 2024 1:31 PM

views 10

हॉकी : पुरुषांच्या कनिष्ठ आशियाई स्पर्धेत भारताचा जपानवर ३-२ असा विजय

ओमानमध्ये मस्कत इथं पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानवर ३-२ अशा फरकानं विजय मिळवला. भारताचा अ गटातला सलग दुसरा विजय आहे. भारताचा पुढचा सामना उद्या तैवानशी होणार असून, रविवारी अंतिम सामन्यात भारताची लढत कोरियासोबत होणार आहे.

November 17, 2024 7:43 PM November 17, 2024 7:43 PM

views 31

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर मात

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज भारताने आज जपानवर ३-० अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी आपल्या खेळाची कमाल दाखवत हा विजय मिळवून दिला. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी पुन्हा भारताच्या संघाची लढत जपानशी होणार आहे.

November 14, 2024 7:58 PM November 14, 2024 7:58 PM

views 14

महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत भारताचा थायलंडवर १३-० असा विजय

बिहारमधे सुरु असलेल्या, महिलांच्या आशियाई हॉकी करंडक स्पर्धेत आज भारतानं थायलंडवर १३-० असा विजय मिळवला. भारतातर्फे दिपीकानं चमकदार कामगिरी करत ५ गोल नोंदवले. प्रिती दुबे, लालरेमसियामी आणि मनिषा चौहान या तिघींनी प्रत्येकी दोन गोल केले. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारताचा यानंतरचा सामना चीनशी होणार आहे.  

October 29, 2024 10:55 AM October 29, 2024 10:55 AM

views 10

आशियाई महिला हॉकी स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर

आगामी ‘आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा २०२४’ साठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सलीमा टेटे संघाचं नेतृत्व करणार असून, नवनीत कौर उपकर्णधार आहे. बिहार मधील राजगीर हॉकी मैदानावर येत्या ११ ते २० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशीच भारतीय संघाचा पहिला सामना मलेशिया संघाशी होणार आहे.