November 17, 2024 11:52 AM November 17, 2024 11:52 AM

views 10

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार आहे. भारतीय महिला खेळाडूंनी आशयाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजयाची घोडदौड सुरू ठेवत चीन ला 3-0 नं हरवून सलग चौथ्यान्दा विजय प्राप्त केला आहे. जपाननं मलेशिया ला 2-1 असं हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपला पहिला विजय निश्चित केला आहे. बिहार मधील राजगीर मैदानावर संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी हा सामना सुरू होईल.