January 10, 2025 1:46 PM January 10, 2025 1:46 PM
5
पुरुष हॉकी इंडिया लीग : श्राची राह बंगाल टायगर्सचा सामना तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार
पुरुष हॉकी इंडिया लीगमध्ये श्राची राह बंगाल टायगर्सचा सामना आज तामिळनाडू ड्रॅगन्सशी होणार आहे. ओडिशातल्या राऊरकेला इथं होणारा सामन्याला रात्री सव्वा आठ वाजता सुरुवात होईल. दरम्यान, काल झालेल्या सामन्यांमध्ये वेदांत कलिंगा लान्सर्सने गोनासिकाचा २-१ असा पराभव केला. अँटोइन किनाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. या विजयासह, लान्सर्स सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून गोनासिका चार गुणांसह सातव्या स्थानी आहे.