November 29, 2025 3:06 PM

views 28

सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश

भारताचा हॉकी संघ सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपोह इथं झालेल्या उपान्त्य सामन्यात भारतानं कॅनडावर १४ विरुद्ध ३ अशा गोलफरकाने दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगने ४ गोल केले.

October 11, 2025 6:53 PM

views 40

Sultan of Johor Cup: भारताचा ग्रेटब्रिटनवर पराभव करत विजयी सलामी

१३व्या  सुलतान जोहर चषक  हॉकी स्पर्धेत भारताच्या  युवा संघाने गतविजेत्या ग्रेटब्रिटनचा  ३ विरुद्ध २ असा पराभव करुन विजयी सलामी दिली. कर्णधार रोहितने २ गोल केले तर पहिलाच गोल रवनीत सिंगने लगावला.  मलेशियात जोहोर बाहरु इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत यजमान मलेशिया व्यतिरिक्त  ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ ऑक्टोबरला होईल. 

April 10, 2025 3:26 PM

views 18

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

भारतीय हॉकी महिला संघ २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या  सुरुवातीला म्हणजे २६ आणि २७ एप्रिल रोजी भारतीय संघाचा सामना   ऑस्ट्रेलियाच्या अ  संघाबरोबर होईल.   त्यानंतर १, ३ आणि ४ मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाबरोबर सामने होतील.भारत सध्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेतले  सर्व सामने पर्थ  हॉकी स्टेडियम वर होणार आहेत.

March 16, 2025 1:04 PM

views 23

हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीचा गौरव

हॉकी इंडिया २०२४मधल्या सामन्यांचं उत्तम प्रसारण केल्याबद्दल प्रसारभारतीला जमनलाल शर्मा पुरस्काराने गौरवण्यात आलं. हॉकी इंडियाचा सातवा वार्षिक पुरस्कारवितरण सोहळा काल नवी दिल्ली इथं झाला. त्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार १९७५ मधे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सविता पुनिया आणि हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून पी आर श्रीजेशला सन्मानित करण्यात आलं. यंदा भारतीय हॉकीचं शताब्दी वर्ष असू...

December 29, 2024 3:18 PM

views 14

हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली एसजी पाईपर्स संघ विजयी

हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या सामन्यात दिल्ली एसजी पाईपर्स या संघाने गोनसिका संघाला हरवलं. ओदिशातल्या राऊरकेला इथं काल झालेला हा सामना संपला तेव्हा दोन्ही संघांनी दोन - दोन गोल करुन बरोबरी साधली होती. मात्र शूटआऊटवरुन झालेल्या अंतिम निकालानुसार दिल्ली एसजी पाईपर्सने गोसनिकाला ४-२ अशी मात दिली. या मालिकेत आज हैदराबाद तूफान आणि श्राची रार बेंगाल टाईगर्स यांच्यातील सामना संध्याकाळी सहा वाजता खेळला जाईल. तर रात्री सव्वाआठला सूरमा हॉकी क्लब आणि तामिळनाडू ड्रॅगन्स यांच्यामधला सामना सुरु होईल.

December 12, 2024 3:48 PM

views 12

प्रसार भारतीचा हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार

आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, दूरदर्शन हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे.   या प्रसंगी हॉकी इंडिया लीग च्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्र...

December 10, 2024 10:03 AM

views 13

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर ५-० असा विजय

ओमानमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक महिलांच्या कनिष्ठ गटातील हॉकी स्पर्धांमध्ये भारतानं मलेशियाचा 5-0 पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. दीपिकानं भारताकडून तीन गोल केले. भारताचा पुढचा सामना चीनबरोबर होणार आहे. आशिया चषक स्पर्धांमधले पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धांसाठी पात्र ठरणार आहेत. 

November 16, 2024 8:14 PM

views 19

महिला हॉकी आशिया करंडक स्पर्धेतल्या सामन्यात भारतानं चीनला नमवलं

बिहारच्या राजगीर स्टेडियमवर सुरू असलेल्या महिला हॉकी आशिया करंडक स्पर्धेत भारतानं आपल्या वैयक्तिक चौथ्या सामन्यात आज चीनला ३-० अशा गोल फरकानं हरवत या स्पर्धेत अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे. प्रतिस्पर्धी चीनच्या संघानंही या स्पर्धेत आतापर्यंत एकही हार पत्करली नव्हती. मात्र, आजच्या सामन्यात चीनच्या चांगल्या सुरुवातीनंतरही भारतीय खेळाडू संगीता, सलीमा आणि दिपीका यांनी आक्रमक खेळ करून प्रत्येकी एक गोल झळकावत  भारताला विजय मिळवून दिला.   आज झालेल्या अन्य सामन्यात जपाननं मलेशियाला २...

September 30, 2024 9:42 AM

views 13

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून आरंभ

हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 च्या चौदाव्या आवृत्तीला आजपासून झारखंडमधील रांची इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 26 संघ सहभागी होत असून प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीचे सामने 7 ऑक्टोबर 2024 रोजी खेळले जाणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने 9 ऑक्टोबर रोजी होतील. उपांत्य फेरीतील विजेते अंतिम फेरीत एकमेकांशी लढणार असून उपांत्य फेरीतील पराभूत संघ 10 ऑक्टोबर रोजी कांस्यपदकासाठी एकमेकांशी लढणार आहेत.

September 14, 2024 7:50 PM

views 13

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर २-१ अशी मात

चीनमध्ये हुलुनबुईर इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात केली. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह यानं भारताच्या बाजूनं दोन गोल केले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून, १६ सप्टेंबर रोजी अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.