November 7, 2025 10:40 AM November 7, 2025 10:40 AM

views 32

भारताच्या गौरवशाली हॉकी खेळाचा शतकोत्सव; देशभरात १४शे सामन्यांचं आयोजन

भारतीय हॉकीच्या गौरवशाली शंभर वर्षांचा उत्सव आज देशभर साजरा करण्यात येणार आहे. शताब्दी समारंभाच्या निमित्तानं, ५५० जिल्ह्यांमध्ये १४०० हून अधिक सामने आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य कार्यक्रम आज सकाळी साडे आठ वाजता नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर होईल, यामध्ये भारतीय हॉकीचा गौरवशाली प्रवास दाखवणारे विशेष कार्यक्रम होतील.   हॉकी इंडियाच्या पुरुष आणि महिला खेळाडूंचा समावेश असलेला विशेष सामना यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात हॉकीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या दिग्गजांचा सत्कार...

November 1, 2025 3:27 PM November 1, 2025 3:27 PM

views 25

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं निधन

भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. केरळच्या कन्नूर इथले रहिवासी असलेले फ्रेडरिक यांनी १९७२ म्युनिक ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. आपल्या धाडसी गोलरक्षणाबद्दल परिचित असलेल्या फ्रेडरिक यांनी १९७१ ते १९७८ दोन विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला.   २०१९ मध्ये यांना ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  

October 13, 2025 3:17 PM October 13, 2025 3:17 PM

views 44

हॉकी स्पर्धेत काल भारताकडून न्यूझीलंडचा ४-२ असा पराभव

मलेशियात जोहोर बहरू इथं सुरू असलेल्या, सुलतान जोहोर कप कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत काल भारताने न्यूझीलंडचा ४-२ असा पराभव केला. भारताकडून अर्शदीप सिंग, पीबी सुनील, अराईजित सिंग हुंडल आणि रोशन कुजूर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताचा पुढीचा सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

September 15, 2025 11:35 AM September 15, 2025 11:35 AM

views 56

महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा विजय

चीनमधील हांगझोऊ इथं महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी काल झालेल्या सामन्यात यजमान चीनविरुद्ध 1-4 असा विजय मिळवला. रौप्य पदकावर नाव कोरत अंतिम फेरी गाठली.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाचे रौप्य पदक मिळवल्याबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात अभिनंदन केलं आहे. दृढनिश्चय आणि सांघिक भावना असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा देशाला अभिमान आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

July 16, 2025 2:38 PM July 16, 2025 2:38 PM

views 18

हॉकीपटू दीपिकाला पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला 

भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला  आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्ष २०२४-२५ चा पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला  आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या  नेदरलँड्सविरुद्ध शानदार गोल करून तिने हा पुरस्कार मिळवला.   पुरुषांच्या गटात, बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्नेझला हा पुरस्कार मिळाला, तर  या पुरस्कारासाठी महिला गटात स्पेनच्या पॅट्रिशिया अल्वारेझ ला ही नामांकन मिळालं होतं.    

June 23, 2025 2:47 PM June 23, 2025 2:47 PM

views 12

हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा

भारतासाठी हॉकीमध्ये दोनवेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  भारतानं बेल्जियमविरुद्धच्या FIH प्रो लीग सामन्यात ४-३ असा विजय मिळवत आपला हंगाम संपवला, त्यानंतर लगेचच ललितने समाजमाध्यमावर सर्वांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.   ललित उपाध्यायनं भारतासाठी १८३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ६७ गोल केले आहेत. २०१४ च्या हॉकी विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या ललितनं टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ ऑलिंपिकमध्ये प्रत्येकी एक कांस्यपदक जिंकलं आहे. भारतीय ह...

June 12, 2025 12:43 PM June 12, 2025 12:43 PM

views 20

हॉकी प्रो लीगमध्ये आज अर्जेंटिनाविरुद्ध भारतीय संघाचा सामना

हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज संध्याकाळी अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.    नेदरलँड्समधे अ‍ॅमस्टेलवीन इथंहा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता सुरू होईल. काल, अटीतटीच्या सामन्यात, भारताचा अर्जेंटिनाने  ३-४ असा पराभव केला.   आतापर्यंत ११ सामने खेळल्यानंतर भारताच्या खात्यावर १५ गुण जमाझाले असून गुणतालिकेत चौथा क्रमांक आहे.

May 23, 2025 11:54 AM May 23, 2025 11:54 AM

views 19

युरोपियन लेगसाठी 24 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर

FIH हॉकी प्रो लीग 2024-25 अंतर्गत युरोपियन लेगसाठी हॉकी संघटनेच्यावतीनं काल 24 सदस्यीय भारतीय पुरुष हॉकी संघ जाहीर करण्यात आला.   पुढील महिन्यात, 7 ते 22 जून या कालावधीत नेदरलँड्समधील अ‍ॅमस्टेलवीन आणि बेल्जियममधील अँटवर्प इथं या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. हरमनप्रीत सिंग कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करेल तर हार्दिक सिंग याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.  

May 5, 2025 1:32 PM May 5, 2025 1:32 PM

views 12

हॉकी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

महिला हॉकीमधे भारत-ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरने 21 व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व चारही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं  होतं.   

April 4, 2025 1:30 PM April 4, 2025 1:30 PM

views 11

१५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

१५ वी  राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद पुरुष गटाची स्पर्धा आजपासून उत्तरप्रदेशात झाशी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरु होत आहे. मार्चमध्ये झालेल्या महिला वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेप्रमाणेच नवीन विभाग आधारित स्वरुपात ही स्पर्धा होईल.    यामध्ये अ, ब आणि क अशा तीन विभागांत  मिळून ३० संघ सहभागी होणार आहेत. यापैकी ब आणि क विभागाचे सामने आजपासून सुरू होत आहेत. तर अ विभागाचे सामने ८ एप्रिलपासून सुरू होतील. येत्या १५ तारखेपर्यंत स्पर्धा चालेल.