January 7, 2025 8:02 PM January 7, 2025 8:02 PM

views 10

HMPV संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात आज झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या आजारासंदर्भात माध्यमांनी योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन आबिटकर यांनी केलं.     वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्...

January 7, 2025 4:55 PM January 7, 2025 4:55 PM

views 13

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे – मंत्री हसन मुश्रीफ

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, लहान मुलं , वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल अस त्यांनी सांगितल.   राज्यात अजून एकही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु सर्व अधिष्ठात्यांनी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरण...

January 7, 2025 9:07 AM January 7, 2025 9:07 AM

views 11

देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण

देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.   कर्नाटकात आढळलेल्या तीन महिन्याच्या अर्भकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, आठ महिन्याच्या अर्भकावर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा एक सामान्य श्वसन आजार असून, यात सर्दी आणि तापाची लक्षणं दिसून येतात. या आजाराचा वि...

January 3, 2025 8:35 PM January 3, 2025 8:35 PM

views 7

चीनमध्ये आढळलेल्या HMPV व्हायरसमुळे चितेंचं कारण नाही

चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही. श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणं दिसतात. या आजाराचा सामना करण्यासाठी देशात संपूर्ण तयारी असल्याचं ते म्हणाले.