January 7, 2025 2:52 PM

views 13

एचएमपीव्ही बद्दल काळजी करण्याची गरज नाही – जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ

भारतात एच.एम.पी.व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसने बाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले असले, तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. हा विषाणू नवीन नाही, तसंच त्यामुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो, असं त्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा एक उपाय असून, एखादा रोगजनक विषाणू आढळून आल्यावर घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. इन्फ्लूएंझा आणि गंभीर स्व...

January 6, 2025 8:56 PM

views 20

देशात HMPV संसर्गाच्या ३ रुग्णांची नोंद, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा

देशातल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरस एचएमपीव्हीच्या एकूण रुग्णांची संख्या ३ झाली आहे. बेंगळुरूमध्ये ३ महिन्यांची मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलामधे तर अहमदाबादमध्ये २ वर्षाच्या मुलात एचएमपीव्हीचा संसर्ग आढळला आहे. अहमदाबाद इथं मुलाला सर्दी-खोकल्याची लक्षणं तर बेंगळुरूतल्या दोघांनाही ब्रॉन्कोन्यूमोनियाचा त्रास होता. तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.   एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणं विशेषत: चीन, मलेशिया आणि विविध देशांमध्ये ...