October 10, 2024 8:04 PM

views 12

हिज्ब-उत-ताहरीरला केंद्र सरकारनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

हिज्ब-उत-तहरीर तसंच तिच्याशी संबंधित सर्व आघाड्या आणि संघटनांना  दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. हिज्ब-उत-तहरीर कर्मठवाद आणि तरुणांना दहशतवादी संघटनांमधे सामील होण्यासाठी प्रेरित करण्याच्या, तसंच दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नांमधे गुंतली असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं जिहाद आणि दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून उलथून पाडणं आणि ईस्लामी राज्य स्थापन करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट आहे, असं गृहमंत्रालयानं म्हटल...