October 21, 2024 4:21 PM October 21, 2024 4:21 PM

views 9

हिंगोली : दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी

हिंगोली जिल्ह्यातल्या पुसेगाव इथे भरधाव गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार अशी मृतांची नावं आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या बबन धाबे यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   दरम्यान, हिंगोलीत झालेल्या दुसऱ्या एका अपघातात पोलिसांच्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात होऊन दोन पोलीस अधिकारी आणि चालक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कुरुंदा इथल्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.  

October 17, 2024 7:13 PM October 17, 2024 7:13 PM

views 11

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात दांडेगाव आणि परिसरामध्ये आज दुपारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले, मात्र त्याची नोंद अद्याप झाली नाही, अशी माहिती जिल्हा अपत्ती व्यवस्थापन कार्यालयातून देण्यात आली. या परिसरात  गेल्या चार वर्षांपासून असे धक्के बसतात. आज दुपारी २ वाजून १० मिनिटांनी आणि नंतर दोन वाजून १९ मिनिटांनी  भूगर्भातून गूढ आवाज येत जमीन हादरल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितलं. हा आवाज येताच नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपाची रिक्टर स्केल नोंद मात्र अद्याप समजू शकली नाही. या अगोदर १० जुल...

September 9, 2024 5:59 PM September 9, 2024 5:59 PM

views 15

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल पाठवण्याच्या मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून विभागीय आयुक्तांमार्फत अहवाल पाठवण्याच्या सूचना  मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. वसमत तालुक्यातील माळवटा, किन्होळा आणि कुरूंदा इथल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या  भागाची पाहणी पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. 

September 1, 2024 3:18 PM September 1, 2024 3:18 PM

views 13

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. 

July 23, 2024 7:43 PM July 23, 2024 7:43 PM

views 12

हिंगोली जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला महाराष्ट्र राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र अंतर्गत आणि केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल क्वालिटी ॲशोरन्स अंतर्गत केलेल्या परीक्षणाद्वारे हिंगोली जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाला' राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार' जाहीर करण्यात आला. येत्या स्वातंत्र्य दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.