June 20, 2025 6:26 PM June 20, 2025 6:26 PM
8
हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही – शरद पवार
हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण, हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही, असं मत खासदार शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. राज्यात सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीच्या वादावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, कोणाला स्वसंमतीनं हिंदी भाषा शिकायची असेल तर त्याला नाही म्हणण्याचं कारण नाही. हिंदी भाषेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतील, असं...